सोमवार, ६ डिसेंबर, २०१०

का कळेना.... मुंबई पुणे मुंबई

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लग वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे......

एक मी एक तू
शब्द मी गीत तू
आकाश तू , आभास तू , साऱ्यात तू........
ध्यास मी श्वास तू
स्पर्श मी मोहोर तू
स्वप्नात तू, सत्यात तू, साऱ्यात तू.....

पंख लाऊनी उडत चालले मन हे तुझ्या सवे
तुझा मी माझी तू कधी केव्हा कसे जुळले बंध हे
अबोल प्रीत हि हे नाते नवे
अजब रीत हि हे स्वप्न नवे.........

या भोवताली काही दिसेना
तू आणि मी, मी आणि तू बाकी उरेना,
हो तो कुठे अन आलोत कोठे
रस्ता कुठे जाई कसा काही कळेना

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लग वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे........

गीत: सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोले.
गायक: स्वप्नील बांदोडकर , बेला शेंडे.

मंगळवार, २९ जून, २०१०

कधी तू ......... मुंबई पुणे मुंबई

कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत

कधी तू ................
कोसळत्या धारा
थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा
भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओलीरात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत

कधी तू अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी
रातराणी वेड्या जंगलात
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

जरी तू कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणांत
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

सोमवार, १४ जून, २०१०

सुखस्पर्श

व. पु. काळे ह्यांच्या वपुर्झा मधील कही अप्रतिम ओळी

सुखस्पर्ष म्हणजे प्रेम नक्कीच नाही तो प्रीतिचा मूळ रंग नाही तो नुसता अभिलाशेचा तवंग ! एक सवंग लालसा ! जाता येता भेटत रहते, जाणवते स्पर्शाची ही लालसा रोज ऑफिसला जाताना लोकलमध्ये सहन करावी लगते रस्त्याना चालताना लादली जाते बुकिंग क्लार्कने टिकिट देताना स्पर्श करावा, बस कंडक्टरने तेच, वाण्याने पुड्या देताना तेच, ऑफिसरने फाइल देताना तेच हीच लालसा ऑफिसच्या लिफ्टमध्ये सुध्दा सुटाबूटात चिकटून जाते. वर पुन्हा 'सॉरीच' गुलाबपाणी शिंपडायचं आणि एक ओशाट हास्य. सगळीकडेच ही लालसा थैमान घालताना दिसते. ऑफिसच्या कामासाठी फोन करावा तर पलीकडचा पुरुषी आवाज अकारण मवाळ होतो. नजरा तर दुसरं कही ओकताच नाहीत. स्त्री देहावर त्या अर्थपूर्ण नजरांची पुटं चढलेली असतील पुटं! भारतीय युद्ध समप्तिनंतर श्रीकृष्णाने अर्जुनला प्रथम राथामधून उतरायला संगीतालं. अर्जुनाला नवल वाटलं. तरी कृष्णाचं ऐकून तो उतरला. त्यानंतर श्रीकृष्ण उतरताच, अर्जुनाचा रथ जळून गेला. त्यावर श्रीकृष्णाने सांगितले, 'कौरव सैन्याने टाकलेल्या अस्त्रंचा परिणाम रथावर झालेला होता. अगोदर मी जर उतरलो असतो, तर हा रथ तुझ्यासकट जळून गेला असता.' आयुष्यभर स्त्रीदेहाचं संरक्षण असाच कुणी अजात कृष्ण करीत असला पाहिजे. नाहीतर पुरुषांच्या नजरांनी तो देह चितेवर चढण्यापूर्वी जळून गेला असता.

शनिवार, २७ जून, २००९

वर्गातल प्रेम

वाऱ्याची झुलूक जाते

देऊन गारवा मनाला

चाहुल पानांची मजबूर करते

नकळत तिच्याकडे बघायला


मन माझे तिच्याकडे वळताच

"सर" वर्गात प्रवेश करतात

अन् प्रेमाचा सर्व नशा

एका क्षणात संपवून टाकतात

सर वर्गातून गेल्यावर

सुरु होतो पुन्हा खेळ

मन धावते तिच्याकडे

णि होतो नजरांचा मेळ...

बुधवार, २४ जून, २००९

बाजीराव-मस्तानीची प्रेमकहाणी

जोधा-अकबर, सलीम-अनारकली या दोन्ही प्रेमकहाण्यांमध्ये एक साम्य आहे. या कहाण्यांमधील दोन्ही स्त्रीपात्रे खरोखरीच होऊन गेली की काय याबद्दल शंका आहे. जोधाबाई ही अकबराची पत्नी की सून असा वाद आहेच. पण गंमत म्हणजे अनारकली ही सलीमची प्रेयसी की "आई' असाही एक वाद आहे. अशी कथा सांगितली जाते, की अनारकली ही अकबराच्या जनानखान्यातली एक बॉंदी. तिचा दर्जा अकबराच्या पत्नीसमान. पण सलीमसाहेब तिच्या प्रेमात पडले. त्यामुळे अकबर संतापला. पण या कथेला तसा काही अस्सल आधार नाही. ते काहीही असो. या प्रेमकहाण्यांनी येथील लोकमानसावर राज्य केले हे खरे.
मराठी मुलखात घडलेली अशीच एक प्रेमकहाणी म्हणजे बाजीराव-मस्तानीची प्रेमकथा. ही कहाणी बाकी अस्सल आहे आणि अव्वलही! खरेतर ही एक शोकांतिकाच म्हणायची. एक ब्राह्मण पेशवा, एक स्वरुपसुंदर मुस्लिम तरूणी, स्वरुपसुंदर म्हणजे किती, की इतकी गोरी, इतकी गोरी, की खाल्लेले पान ज्याच्या सुरईदार गळ्यातून उतरताना दिसायचे! (ही अर्थातच एक दंतकथा.) आणि ते पेशवाईतलं वातावरण! जणू या कहाणीच्या मुळातच शोकांतिकेची बिजं होती...
मस्तानी ही बाजीरावाला मिळाली ती भेट म्हणून! बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल बुंदेला. त्याला बाजीरावाने मोगलांच्या तडाख्यातून वाचविले. तेव्हा कृतज्ञतेने त्याने बाजीरावांना बिदागी दिल्या. त्यात ही मस्तानी नावाची नृत्यांगना होती. (मस्तानी छत्रसालास त्याच्या पर्शियन पत्नीपासून झालेली मुलगी असल्याचेही स‌ांगितले जाते.) बाजीरावाने मात्र तिला मानाने वागविले. त्यांनी तिला पत्नी मानून शनिवारवाड्यात आणले. तेथे तिच्यासाठी मस्तानी महाल बांधला. त्या महालात ती राहात असे. बाजीरावांचा तिच्यावर जेवढा जीव होता, तेवढेच तिचेही त्यांच्यावर प्रेम होते. ती त्यांची सर्वप्रकारे काळजी घेत असे. असे सांगतात, की बाजीराव स्वारीवर असताना ती घोड्यावर स्वार होऊन बाजीरावाबरोबर तेवढ्याच वेगाने दौडत चाले. मस्तानी नृत्यनुपुण होता. शनिवारवाड्यात गणेशचतुर्थीस तिचा नृत्यगायनाचा कार्यक्रम होत असे.
नानासाहेब पेशव्याचे लग्न सन 1730 त झाले. त्यावेळच्या खर्चाच्या हिशोबात तिच्या नावाचा उल्लेख सर्वप्रथम आढळतो. (पेशवे दप्तर 30, ले. 363) इ. स. 1734 मध्ये बाजीरावापासून तिला पुत्ररत्न झाले. (मराठी रियासत, बाजीराव, पृ. 403) त्याचे नाव समशेरबहाद्दर असे ठेवण्यात आले. हा पुढे पेशव्यांच्या फौजेत खासा सरदार म्हणून वावरला. पेशव्यांच्या मुलाबरोबरच त्याचेही शिक्षण झाले. पेशव्यांच्या अनेक मोहिमात राहून त्याने मराठी राज्याची सेवा उत्कृष्ट बजावली. तो पानिपती कामास आला.
मस्तानी बाजीरावांबरोबर पत्नी म्हणून वावरू लागल्यामुळे पेशव्यांच्या घरात तिच्याविरुद्ध कलह सुरू झाला.. पेशव्यांची आई राधाबाई, भाऊ चिमाजी अप्पा आणि चिरंजीव नानासाहेब या तिघांचा मस्तानीने बाजीरावाबरोबर राहण्यास विरोध होता. बाजीरावाने तिचा नाद सोडून द्यावा म्हणून चिमाजी अप्पा व मातोश्रीने फार प्रयत्न केले. पण बाजीरावाने त्या गोष्टीस सरळ नकार दिला. डिसेंबर 1739 मध्ये तर आपल्याबरोबर ही मंडळी मस्तानीस स्वारीस पाठवित नाहीत याचा राग येऊन वैतागून बाजीराव नासिरजंगावरील स्वारीवर गेले. ते स्वारीवर असतानाच पेशव्यांच्या घरी पुण्यास मुलांच्या मुंजी झाल्या. डिसेंबर 1739 ते 1740 मार्च पर्यंत या स्वारीची कामगिरी त्यांनी व्यथित अंतःकरणाने सिद्धिस नेली.
बाजीराव स्वारीवर आहे याचा फायदा घेऊन या काळात मस्तानीला पुण्यात कैदेत ठेवण्यात आले। एवढेच नव्हे, तर बाजीरावापासून मस्तानीस दूर करण्याची परवानगी शाहू महाराजांकडून मिळविण्याचा प्रयत्नही पेशवे कुटुंबियांनी केला. परंतु शाहू महाराजांनीही त्यांना रास्त सल्ला दिला. मस्तानीस कैदेत ठेवून बाजीरावास दुखवू नये असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ""राऊ यास खट्टे न करावे. त्यांचे समाधान राखावे. तिला अटकाव करून सल्ला तोडू नये.''....
नासिरजंगावरील स्वारी आटोपल्यावर विमनस्क स्थितीत बाजीराव खर्गोण परगण्यात नवीन मिळालेल्या जहागिरीची व्यवस्था पाहण्यास गेले. तेथे ते ज्वराने आजारी पडले. त्यातच रावरेखेडी येथे 28 एप्रिल 1740 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी बाजीरावांची धर्मपत्नी काशीबाई व मुलगा जनार्दन ही नुकतीच पुण्याहून येऊन पोचली होती. मस्तानी मात्र पुण्यातच कैद होती.
बाजीरावांच्या मृत्यूची हकिकत तिला समजताच तिनेही मृत्यूला कवटाळले. तिचा मृत्यू विष प्राशन करून झाला की मुद्दाम प्राणघात करून घेतला हे समजण्यास मार्ग नाही. शनिवारवाड्यात मृत्यू झाल्यावर तिला तिच्या इनामाचे गाव पाबळ येथे नेऊन दफन करण्यात आले.बस्स. एवढीच ही प्रेमकहाणी! एक मोठी प्रेमकहाणी!

मंगळवार, २३ जून, २००९

कविता मला भावलेली (दु:खाच्या घरी एकदा)

दु:खाच्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरु पीऊन अगदी
झींगली होती कार्टी…

दु:ख म्हणाले ” दोस्तानों!
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल
म्हणूनराग मानू नका!

मनात खूप साठल आहे
काहीच सुचत नाही
माझी ‘स्टोरी’ सांगीतल्या शिवाय
आता राहवत नाही…

मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेव्हा
जत्रेत गेलो होतो…

गर्दी अशी जमली
नी गोंधळ असा उठला…
माणसांच्या त्या गर्दी मध्ये
सुखाचा हात सुटला!

तेव्हा पासून फ़िरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का ‘सुख’ माझा
कुणाच्या ही नजरेत…”

सुखा बरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दु:ख ढसाढसा रडले!

नशा सगळ्यांची उतरली
दु:खाकडे पाहून!
दु:खालाही सुख मिळावे
वाटले राहून राहून…

सुखाच्या शोधामध्ये आता
मी सुद्धा फ़िरतोय
दु:खाला शांत करायचा
खूप प्रयत्न करतोय…

जीवनाच्या रथाचे
आहेत सुख दु:ख सारथी
सुख मिळाले तर दु:खाच्या घरी
मीच देईन पार्टी …

मंगळवार, १६ जून, २००९

‘पुलं’च्या लग्नाची गोष्ट

१२ जून, पुलं जाऊन नऊ वर्षे झाली. त्यानिमित्ताने महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पुलंच्या आणि सुनीताबाईंच्या लग्नाची ही न्यारी गोष्ट...

एका लग्नाची गोष्ट आहे ही... यात वर आहेत महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे आणि वधू आहेत सुनीताबाई... मोठ्या थाटामाटात, धूमधडाक्यात त्यांचं लग्न झालं, असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा जरा... आदर्श कपल असलेल्या पुलं आणि सुनीताबाईंच्या लग्नाची गोष्टच जरा न्यारी आहे

पुलंची आणि सुनीताबाईंची पहिली भेट झाली ती मुंबईत. ६५-७० वर्षांपूर्वीचा हा काळ. तेव्हा दादर-माटुंगा भागत जुवळे नावाच्या एका गृहस्थांनी ओरिएंट हायकूल नावाची शाळा सुरु केली होती. त्या शाळेत भाई म्हणजे पुलं आणि सुनीताबाई हे दोघेही शिक्षक म्हणून कामाला लागले. तिथेच त्यांची पहिली ओळख झाली. पुलं वरच्या इयत्तेतील मुलांना शिकवायचे, तर सुनीताबाई खालच्या इयत्तेतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तेव्हा पुलंच्या वर्गात शिकायला होते. तर त्यांचे बंधू आणि राज ठाकरेंचे वडिल श्रीकांत ठाकरे यांना सुनीताबाई शिकवायला होत्या. शाळेत काम करत असतानाच दोघांची ओळख वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पुलंनीच सुनीताबाईंना मागणी घातली आणि लग्न करण्यासाठी आग्रह धरला.

सुनीताबाईंना पुलं आवडत होते, पण लग्नासारख्या बंधनात अडकायला त्या सुरुवातील तयार नव्हत्या.. त्यात दुसरी अडचण होती ती म्हणजे पुलंचं आधी एक लग्न झालेलं होतं. कर्जतच्या दिवाडकरांच्या घरातील मुलीशी पुलंचा विवाह झाला परंतु दुर्दैवाने लग्नानंतर काही दिवसांतच तापाचं निमित्त झालं आणि ती मुलगी देवाघरी गेली. त्यामुळे अशा बीजवराशी लग्न लावायला सुनीताबाईंच्या घरचे राजी नव्हते. सुनीताबाईंच्या आईने तर लेकीसाठी चांगली स्थळं पाहून ठेवली होती. त्यात सुनीताबाई मूळच्या ठाकूर आणि पुलं ठरले देशपांडे. परजातीतला म्हणून ठाकूर मंडळी नाके मुरडत होती.

सुनीताबाईंना पुलं आवडत होते, पण लग्नासारख्या बंधनात अडकायला त्या सुरुवातील तयार नव्हत्या. त्यात दुसरी अडचण होती ती म्हणजे पुलंचं आधी एक लग्न झालेलं होतं. कर्जतच्या दिवाडकरांच्या घरातील मुलीशी पुलंचा विवाह झाला. परंतु दुर्दैवाने लग्नानंतर काही दिवसांतच तापाचं निमित्त झालं आणि ती मुलगी देवाघरी गेली. त्यामुळे अशा बीजवराशी लग्न लावायला सुनीताबाईंच्या घरचे राजी नव्हते. सुनीताबाईंच्या आईने तर लेकीसाठी चांगली स्थळं पाहून ठेवली होती. त्यात सुनीताबाई मूळच्या ठाकूर आणि पुलं ठरले देशपांडे. परजातीतला म्हणून ठाकूर मंडळी नाके मुरडत होती.

अगदी त्याच बैठकीत रजिस्टर लग्न करायचं ठरलं. त्याकाळी रजिस्टर लग्नासाठीचा छापील फॉर्म आठ आण्याला मिळायचा. इतर कुणावर भुर्दंड नको म्हणून सुनीताबाईंनी तो आधीच आणून ठेवला होता. त्यांचे वडिल हे रत्नागिरीतले नामवंत वकील होते. दुस-या दिवशी कोर्टातून घरी परतताना त्यांनी आपल्या दुस-या वकिल मित्रांना मुलीच्या विवाहाबाबत सांगितले. मुलीचं लग्न रजिस्टर करायचं आहे, साक्षीदार म्हणून सह्या करायला तुम्ही केव्हा येऊ शकाल ? अशी विचारणा त्यांनी केली. तेव्हा वकिल मित्र तातडीने तयार झाले. फॉर्म वगैरे तयार असेल तर आताच निघूया, असे ते म्हणाले आणि ही वरात घराकडे निघाली.

जिल्हा न्यायालयासमोरच सुनीताबाईंचे घर होते.. वडिल घरी आले की, दुपारचा चहा होत असे. वाड्याच्या फाटकाची खिटी वाजली की, वडिल आले हे कळायचे. त्यादिवशीही खिटी वाजल्यानंतर आईने चहाला आधण ठेवले. त्यांच्यासोबत आणखी तीन-चारजण आल्याचे सुनीताबाईंनी आईला सांगितले. आईने आधणात चार-पाच कप पाणी वाढवले. साक्षीदार मंडळी जमली होती. पुढच्या काही मिनिटातच पुलं आणि सुनीताबाईंचे लग्न लागणार होते. घरातील कुणाला याची साधी पूर्वकल्पनाही नव्हती. सुनीताबाई साधी, खादीची सूती साडी नेसल्या होत्या आणि नवरदेव तर चक्क घरी धुतलेल्या साध्या पायजम्यावर. बिनबाह्यांची बनियन घालून चहाची वाट बघत, सर्वांशी गप्पा मारत, सर्वांना हसवत बसले होते.

वडिलांनी आपल्या जावयाची सर्वांना ओळख करुन दिली. सगळ्यांच्या समक्ष पुलं आणि सुनीताबाईंनी फॉर्मवर सह्या केल्या आणि लग्नाचा सोहळा संपला. दरदिवशीच्या दुपारच्या चहाबरोबरच अगदी साधेपणाने पुलंचे लग्न झाले. केवळ छापील फॉर्मवर सह्या करुन ‘ कु. सुनीता ठाकूर ’ या ‘ सौ. सुनीता देशपांडे ’ बनल्या !