मंगळवार, २९ जून, २०१०

कधी तू ......... मुंबई पुणे मुंबई

कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत

कधी तू ................
कोसळत्या धारा
थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा
भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओलीरात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत

कधी तू अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी
रातराणी वेड्या जंगलात
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

जरी तू कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणांत
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

५ टिप्पण्या:

  1. गाणे अप्रतिम आहे
    बोल कुणाचे आहेत व गातंय कोण याची कृपया माहिती असल्यास द्यावी

    धन्यवाद....................!

    उत्तर द्याहटवा
  2. बोल आहेत श्रीरंग गोडबोले यांचे आणि गायलंय ह्रिषीकेश रानडे यांनी.

    उत्तर द्याहटवा
  3. फारच सुंदर गाण आहे मनाला वेड लाऊन द्यावे असे

    उत्तर द्याहटवा
  4. अ प्रतीम गाणे ……. धन्यवाद या गाण्यासाठी

    उत्तर द्याहटवा