सोमवार, १४ जून, २०१०

सुखस्पर्श

व. पु. काळे ह्यांच्या वपुर्झा मधील कही अप्रतिम ओळी

सुखस्पर्ष म्हणजे प्रेम नक्कीच नाही तो प्रीतिचा मूळ रंग नाही तो नुसता अभिलाशेचा तवंग ! एक सवंग लालसा ! जाता येता भेटत रहते, जाणवते स्पर्शाची ही लालसा रोज ऑफिसला जाताना लोकलमध्ये सहन करावी लगते रस्त्याना चालताना लादली जाते बुकिंग क्लार्कने टिकिट देताना स्पर्श करावा, बस कंडक्टरने तेच, वाण्याने पुड्या देताना तेच, ऑफिसरने फाइल देताना तेच हीच लालसा ऑफिसच्या लिफ्टमध्ये सुध्दा सुटाबूटात चिकटून जाते. वर पुन्हा 'सॉरीच' गुलाबपाणी शिंपडायचं आणि एक ओशाट हास्य. सगळीकडेच ही लालसा थैमान घालताना दिसते. ऑफिसच्या कामासाठी फोन करावा तर पलीकडचा पुरुषी आवाज अकारण मवाळ होतो. नजरा तर दुसरं कही ओकताच नाहीत. स्त्री देहावर त्या अर्थपूर्ण नजरांची पुटं चढलेली असतील पुटं! भारतीय युद्ध समप्तिनंतर श्रीकृष्णाने अर्जुनला प्रथम राथामधून उतरायला संगीतालं. अर्जुनाला नवल वाटलं. तरी कृष्णाचं ऐकून तो उतरला. त्यानंतर श्रीकृष्ण उतरताच, अर्जुनाचा रथ जळून गेला. त्यावर श्रीकृष्णाने सांगितले, 'कौरव सैन्याने टाकलेल्या अस्त्रंचा परिणाम रथावर झालेला होता. अगोदर मी जर उतरलो असतो, तर हा रथ तुझ्यासकट जळून गेला असता.' आयुष्यभर स्त्रीदेहाचं संरक्षण असाच कुणी अजात कृष्ण करीत असला पाहिजे. नाहीतर पुरुषांच्या नजरांनी तो देह चितेवर चढण्यापूर्वी जळून गेला असता.

1 टिप्पणी:

  1. खरच वाईट आहे.
    पुष्कळदा, टवाळ मंडळीतही गप्पा अशाच असतात की स्त्रिया एवढ्या सजतातच कशासाठी? आणि जर छेडलं नाही तर काय अपमान होईल त्या सौंदर्याचा?.... असच काही तरी. कायम सतत जर कोणाला अशा नजरांचा सामना करावा लागला तर खरंच वाईट वाटेल.

    पण ज्याला खरोखरच कुणाबद्दल आकर्षण असेल तर ते कळवण्याचा योग्य मार्ग कुठला? प्रेमही कळवल्याशिवाय कसं जमणार? निसर्गतःच असणारं आकर्षण लपवणं ठीक का सांगणं?

    या दोन प्रकारांत फरक कसा करणार?
    एक मात्र खरं कि जाहिररित्या अपमानास्पद वागणं नेहमी चूक.

    "तुम्हाला आई बहिण आहे की नाही" हे नेहमी लक्षात असावं....

    उत्तर द्याहटवा