डोळ्यांत स्वप्न आहेत भरलेली
झोप अन् चैन पूर्ण उडालेली
इच्छा आयुष्य तुजसंग जगण्याची
दे ना साथ मला जन्मभराची
तुझ्या आठवांना असा आठवतो मी
त्या शब्दांना काळजांत कोरतो मी
ती प्रतिमा तुझी डोळ्यांत साठवतो मी
तो सहवास तुझा आजन्म स्मरतो मी
स्वप्न माझ्या मनातली
तूच माझ्या स्वप्नातली
आलीस अशी आयुष्यात
जशी परी स्वर्गातली
बुधवार, २० मे, २००९
मंगळवार, १९ मे, २००९
एक प्रवास
गाड़ी पळते की झाडे पळतात
कळत होते मन धावत होते
स्थानके मागे पडत होती
मी मात्र विचारात गुंतून गेलो
प्रकाश अन् सावल्यांचा खेळ चालता
अचानक अंधाराचा भास झाला
शिळ घालत गाड़ी धावत होती
मी मात्र विचारात गुंतून गेलो
लाल शर्यतीत कुली धावत आला
सामान उचलायला मदत केली
मागुन ह्याच्या चालत होतो
प्रवास माझा संपलेला होता
कळत होते मन धावत होते
स्थानके मागे पडत होती
मी मात्र विचारात गुंतून गेलो
प्रकाश अन् सावल्यांचा खेळ चालता
अचानक अंधाराचा भास झाला
शिळ घालत गाड़ी धावत होती
मी मात्र विचारात गुंतून गेलो
लाल शर्यतीत कुली धावत आला
सामान उचलायला मदत केली
मागुन ह्याच्या चालत होतो
प्रवास माझा संपलेला होता
शनिवार, १६ मे, २००९
मालवून टाक दीप - सुरेश भट
मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग
त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात
हाय तू करु नकोस, एवढयात स्वप्न भांग
दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रुपरंग
गार गार या हवेत घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक एकवार अंतरंग
ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग
काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग
त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात
हाय तू करु नकोस, एवढयात स्वप्न भांग
दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रुपरंग
गार गार या हवेत घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक एकवार अंतरंग
ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग
काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)