बुधवार, २० मे, २००९

काही चारोळ्या

डोळ्यांत स्वप्न आहेत भरलेली
झोप अन् चैन पूर्ण उडालेली
इच्छा आयुष्य तुजसंग जगण्याची
दे ना साथ मला जन्मभराची

तुझ्या आठवांना असा आठवतो मी
त्या शब्दांना काळजांत कोरतो मी
ती प्रतिमा तुझी डोळ्यांत साठवतो मी
तो सहवास तुझा आजन्म स्मरतो मी

स्वप्न माझ्या मनातली
तूच माझ्या स्वप्नातली
आलीस अशी आयुष्यात
जशी परी स्वर्गातली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा