सोमवार, ६ डिसेंबर, २०१०

का कळेना.... मुंबई पुणे मुंबई

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लग वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे......

एक मी एक तू
शब्द मी गीत तू
आकाश तू , आभास तू , साऱ्यात तू........
ध्यास मी श्वास तू
स्पर्श मी मोहोर तू
स्वप्नात तू, सत्यात तू, साऱ्यात तू.....

पंख लाऊनी उडत चालले मन हे तुझ्या सवे
तुझा मी माझी तू कधी केव्हा कसे जुळले बंध हे
अबोल प्रीत हि हे नाते नवे
अजब रीत हि हे स्वप्न नवे.........

या भोवताली काही दिसेना
तू आणि मी, मी आणि तू बाकी उरेना,
हो तो कुठे अन आलोत कोठे
रस्ता कुठे जाई कसा काही कळेना

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लग वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे........

गीत: सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोले.
गायक: स्वप्नील बांदोडकर , बेला शेंडे.

मंगळवार, २९ जून, २०१०

कधी तू ......... मुंबई पुणे मुंबई

कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत

कधी तू ................
कोसळत्या धारा
थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा
भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओलीरात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत

कधी तू अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी
रातराणी वेड्या जंगलात
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

जरी तू कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणांत
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

सोमवार, १४ जून, २०१०

सुखस्पर्श

व. पु. काळे ह्यांच्या वपुर्झा मधील कही अप्रतिम ओळी

सुखस्पर्ष म्हणजे प्रेम नक्कीच नाही तो प्रीतिचा मूळ रंग नाही तो नुसता अभिलाशेचा तवंग ! एक सवंग लालसा ! जाता येता भेटत रहते, जाणवते स्पर्शाची ही लालसा रोज ऑफिसला जाताना लोकलमध्ये सहन करावी लगते रस्त्याना चालताना लादली जाते बुकिंग क्लार्कने टिकिट देताना स्पर्श करावा, बस कंडक्टरने तेच, वाण्याने पुड्या देताना तेच, ऑफिसरने फाइल देताना तेच हीच लालसा ऑफिसच्या लिफ्टमध्ये सुध्दा सुटाबूटात चिकटून जाते. वर पुन्हा 'सॉरीच' गुलाबपाणी शिंपडायचं आणि एक ओशाट हास्य. सगळीकडेच ही लालसा थैमान घालताना दिसते. ऑफिसच्या कामासाठी फोन करावा तर पलीकडचा पुरुषी आवाज अकारण मवाळ होतो. नजरा तर दुसरं कही ओकताच नाहीत. स्त्री देहावर त्या अर्थपूर्ण नजरांची पुटं चढलेली असतील पुटं! भारतीय युद्ध समप्तिनंतर श्रीकृष्णाने अर्जुनला प्रथम राथामधून उतरायला संगीतालं. अर्जुनाला नवल वाटलं. तरी कृष्णाचं ऐकून तो उतरला. त्यानंतर श्रीकृष्ण उतरताच, अर्जुनाचा रथ जळून गेला. त्यावर श्रीकृष्णाने सांगितले, 'कौरव सैन्याने टाकलेल्या अस्त्रंचा परिणाम रथावर झालेला होता. अगोदर मी जर उतरलो असतो, तर हा रथ तुझ्यासकट जळून गेला असता.' आयुष्यभर स्त्रीदेहाचं संरक्षण असाच कुणी अजात कृष्ण करीत असला पाहिजे. नाहीतर पुरुषांच्या नजरांनी तो देह चितेवर चढण्यापूर्वी जळून गेला असता.